कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदारसंघ पर्जन्यछायेखाली येत असून आपल्याकडे दरवर्षी पडणारा पाऊस हा जेमतेमच असतो. परंतु यावर्षी पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी होऊनही अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही, तर खरिप पिकांचे किती नुकसान होईल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विम्याच्या माध्यमातून शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी आत्तापासूनच पाठपुरावा सुरु करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील मढी खु. येथे आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसाध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोळपेवाडी व आ. आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
आ. काळे म्हणाले, मोफत आरोग्य तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून अशा शिबिरांचा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या गरजू रुग्णांना लाभ होत असून अशी शिबिरे राबविणे काळाची गरज आहे. मतदार संघातील शेतकर्यांनी सुरुवातीच्या पावसावर खरिपाच्या पेरण्या केलेल्या आहेत. परंतु पावसाळा सुरू होवून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी होत असून खरीप पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. जर येत्या चार दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडला तर शेतकर्यांच्या पदरात काही तरी पडेल. लहरी हवामानामुळे शेतकर्यांच्या होणार्या नुकसानीची पिक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आत्तापासूनच पाठपुरावा करणार आहे.
याप्रसंगी आ. प्रा. रमेश बोरणारे यांनी योगीराज श्री सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे होणार्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण आ. काळे यांना दिले. याप्रसंगी डॉ. प्रकाश कोळपे, काळे कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, सुभाष आभाळे, मोहनराव आभाळे, भाऊसाहेब कुर्हाडे, अजय गवळी, उत्तमराव कुर्हाडे, सुधाकर कुर्हाडे, श्रीधर आभाळे, सोपानराव आभाळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे, सरपंच सुनील भागवत, उपसरपंच लीना आभाळे, बिपिन गवळी, भारत आभाळे, मोहन वाकचौरे, प्रकाश आभाळे, जिजाबापू आभाळे, शंकर आभाळे, सुकदेव भागवत, मोहन वाकचौरे, आबा आभाळे, शिवाजी आभाळे, रवी आभाळे, ललित आभाळे, प्रमोद आभाळे, नारायण आभाळे, बाबासाहेब आभाळे, गोरख रहाणे, संचित काळे, धनंजय आभाळे, पंकज गवळी, अजय आभाळे, अमोल आभाळे, अमोल माळी, पोपट दुशिंग, पुष्पा आभाळे, लंका कासार, बादशहा माळी, माधव कासार, भीमराज भागवत, बाबासाहेब गवळी, अरुणा तिवारी, प्रदीप कुर्हाडे, नंदकिशोर औताडे, प्रकाश गवळी, शिवाजी आभाळे, राजेंद्र पवार, रोहन आभाळे, नितीन पवार, दादासाहेब त्रिभुवन, रंगनाथ गवळी, वसंत भागवत, राजेंद्र आभाळे, दीपक सूर्यवंशी, गणेश आभाळे, रंभाजी आभाळे, सुभाष आभाळे, शिरू पोटे उपस्थित होते.
हेही वाचा :