अहमदनगर

फुकटचे नारळ फोडण्याची हौस भागेना : आ. प्राजक्त तनपुरे

Laxman Dhenge

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड महामार्गावर आ. प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडताच मुळा डॅम फाटा ते मुळा धरणाला जोडणार्‍या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. काम सुरू होत नाही, तोच खा. डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी रस्त्याचा शुभारंभ कार्यक्रम घेतला. यावर आमदार तनपुरे यांनी 'कर्डिलेंना जनतेने जागा दाखवूनही त्यांची फुकटचे नारळ फोडण्याची हौस भागत नसल्याची खरपुस टीका केली.

आ. तनपुरे म्हणाले, मुळा धरणाला जोडणार्‍या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी 2022 मध्ये महाविकास आघाडी शासन काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहकार्य केले. निधी मंजूर झाल्यानंतर कामाचा शुभारंभ होण्यापूर्वी सत्तांतर झाले. श्रेय मिळू नये म्हणून कोट्यवधी रूपयांच्या विकास कामांना बे्रक लावण्याचे काम जनतेने नाकारलेल्या नेत्याकडून झाले. राज्यात सत्तेचा वापर विकास कामांसाठी नव्हे तर विकास कामे थांबविण्यासाठी करणार्‍यांनी मुळा डॅम फाटा ते मुळा धरण रस्त्याच्या कामात अडचण आणली. मर्जीतला व्यक्तीला ठेका मिळावा म्हणून चांगलीच उठाठेव केली, परंतु दुसर्‍याच व्यक्तीला ठेका मिळाल्याने काम सुरू होऊ न देता प्रशासनावर दबाव आणला.

अखेर नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करताच ठेकेदाराने कामास प्रारंभ केला, असे सांगत रस्त्याचे काम होत नसताना ढुंकूनही न पाहिलेल्या नेत्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मुळा धरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभासाठी केलेला आटापिटा हस्यास्पद असल्याची टीका आ. तनपुरे यांनी सोशल मिडियातून केली. नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन केल्याने काम सुरु झाले. तेव्हा वर टोपी करून उद्घाटनवीर श्रेय घेण्यास अवतरल्याची टीका कर्डिले यांचे नाव न घेता आ. तनपुरे यांनी केली.

'ते' आता 'टोपी'वर करुन आले..!

मुळा धरण रस्त्याच्या कामाला एप्रिल 2022 मध्ये मंजुरी मिळाली. राजकीय अट्टाहासातून स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी दीड वर्ष आटापिटा केला. परिणामी काम सुरू होण्यास दीड वर्ष उशीर होण्यास माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हेच जबाबदार असल्याची टिका आ. तनपुरे यांनी नाव न घेता केली. सोशल मिडियामध्ये ज्यांच्यामुळे दीड वर्ष उशीर झाला तेच आता 'टोपी'वर करुन आल्याची टीका आ. तनपुरे यांनी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT