अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दूरगाव (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना गजाआड केले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीला पळवून नेणारा अजिम खलील शेख (वय 21, रा. थोटेवाडी, दुरगाव, ता. कर्जत), त्याला मदत करणारा मनोज बापू कटारे (वय 23, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत हल्ली रा. गौतमनगर, पवई झोपडपट्टी, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली.
सईद शहाबुद्दीन शेख (वय 24, रा. स्वामी चिंचोली, शेखवस्ती, ता. दौंड, जिल्हा पुणे), गोकुळ महादेव भांगे (वय 33, रा. थोटेवाडी, दूरगाव, ता. कर्जत, हल्ली रा. पाटस, ता. दौंड, जि.पुणे), परवीन शेखलाल मुलानी (वय 37, रा. भिगवन, ता. इंदापुर, जिल्हा पुणे हल्ली रा. राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे) या मदत करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 मे 2023 रोजी म्हसोबा दूरगाव (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्ती फूस लावून पळवून नेले. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी चार पथके नेमली होती. आरोपी पीडित मुलीला अजमेर (राज्यस्थान) येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिस पथकाने अजमेर येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. परिसरात सीसीटीव्ही फुटेज, लॉज तपासले. सोशल मीडियावरही आरोपीचे फोटो व्हायरल केले. आरोपी सतत जागा बदलत होते. आरोपी पुढे जयपूरला व तेथून सवाई माधवपूर येथे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी तेथ तपास केला असता मुख्य आरोपीचा साथीदार मनोज कटारे मुंबईकडे जाताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी अजिज शेख हा सुरत येथे उतरून हैदराबादकडे रेल्वेने जाणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सुरत रेल्वेस्थानकावरून पीडित मुलगी व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला कर्जत पोलिस ठाण्यात हजर केले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्तात्रेय हिंगडे, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, राहुल गुंडू, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा