अहमदनगर

राज्यात घडलेली घटना लोकशाही, राज्यघटनेकरिता दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

backup backup

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात आणि देशात २०१४ पासून लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे. घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे. याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र, आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेकरिता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटने करता ही दुर्दैवाची आहे. पुढील काळात देश कसा चालेल हे? काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत, विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल, अशी चिंता थोरात यांनी व्यक्त केली.

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे. जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आलेत, अशी टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT