कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायतीच्या विविध समित्यांच्या निवडी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये बांधकाम विभागाच्या सभापतीपदी ताराबाई कुलथे यांची निवड करण्यात आली.
ताराबाई कुलथे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. विविध समित्यांवर काम केल्यामुळे त्यांचा मोठा अनुभव आहे. संत नरहरी सोनार पालखी महोत्सव समितीचे राज्याचे अध्यक्ष व सराफ व्यावसायिक सचिन कुलथे यांच्या त्या मातोश्री आहेत.
नगरपंचायतीच्या विषेश समित्यांच्या सभापतींच्या निवडी आज करण्यात आल्या. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी उषा राऊत, आरोग्य समितीच्या सभापतीपदी रोहिणी घुले, तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब तोरडमल, महिला व बालकांच्या सभापतीपदी सुवर्ण सुपेकर यांच्या निवडी करण्यात आली. निवडीनंतर सर्व नूतन सभापतींचा सन्मान राष्ट्रवादीचे नेते नामदेव राऊत व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी केला. या निवडींसाठी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते संतोष म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवक व नगरसेविकांची आज नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक सतीष पाटील, अमृत काळदाते, भास्कर भैलूमे, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, नगरसेविका प्रतिभा भैलूमे, ज्योती शेळके, छाया शेलार, लंकाबाई खरात, सचिन कुलथे आदी उपस्थित होते. बैठकीत आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात निर्मल दिंडी अभीयान राबविले जाणार आहे.
याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये टॉयलेट, पाणी पुरवठा, स्वच्छता, निवास व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा, निवास व्यवस्था आदींवर चर्चा करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी 25 लाखांचा निधी नगरपंचायतीसाठी मंजूर केला आहे. यामधून कापरेवाडी वेस येथील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, तसेच हायड्रोलिक गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा