अहमदनगर

संगमनेर : युरिया खरेदीसाठी औषधांची सक्ती थांबवावी; भाजपचा आंदोलनाचा इशारा

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : युरिया खताच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना इतर औषधांची सक्ती करुन लूट केली जात असल्याची दखल घेत संबंधीतांवर तातडीने कारवाई करावी आणि केंद्र व राज्य सरकारची बदनामी थांबवावी. अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्यावतीने प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. औषधांची सक्ती न थांबवल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्ट मंडळाच्या वतीने देण्यात आला.

संध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या पेरणीची कामे सुरु आहेत. हंगामासाठी सरकारने खताची उपलब्धता करुन दिली आहे. मात्र युरीया खताची खरेदी करताना संगमनेर शेतकी सहकारी संघातून तसेच खाजगी दुकानदार युरीया खत हवे असल्यांस जाणिवपूर्वक इतर आवश्यक नसलेल्या औषधांची खरेदीची सक्ती शेतकर्‍यांवर करीत आहेत. या सक्तीव्दारे शेतकर्‍यांची अडवणूक करत एकप्रकारे लूट काक्षरत आहे.

इतर उपयोगी नसलेले औषध घेतले तरच युरीया खत मिळेल असे शेतकी संघ किंवा खाजगी दुकानदार यांच्याकडून शेतकर्‍यांना सांगण्यात येते. हे दुकानदार युरीया खत सरकारने उपलब्ध करून न दिल्याचा संभ्रम निर्माण करून देत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्‍यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना भेटून निदर्शनास आणून दिल्या आहेत. किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी शैलेश हिंगे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन सादर केले.

या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेवून शेतकर्‍यांवर होणार्‍या औषधांची सक्ती तातडीने थांबवावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रविंद्र थोरात, अमोल खताळ, अशोक कानवडे, रोहिदास साबळे, संजय मोरे, संदीप क्षिरसागर, अशोक नन्नवरे, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख संजय पावसे यांच्यासह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

खतासाठी शेतकर्‍यांची अडवणूक

शेतकी सहकारी संघ तसेच काही खासगी दुकानांमधून युरीया खत हवे असल्यास जाणिवपूर्वक इतरही औषधं खरेदी करण्याची सक्ती करुन एक प्रकारे अडवणूक केली जात आहे. वास्तविक खताची उपलब्धता असतानाही शेतकर्‍यांना खत उपलब्ध करुन न देणे ही एकप्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक आहे.

संगमनेर शेतकी संघाने कायम शेतक र्‍यांना मदतीची भूमिका घेतली असूनशेत कर्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सात त्याने गुणवत्तापूर्वक काम केले आहे. या शिवाय संघ युरिया या खताबरोबर शेतक र्यांना लिंकिंग प्रोडक्ट घ्यावे असे बंधन कारक करत नाही मात्र खत कंपन्यांनी युरिया खताबरोबर लिंकिंग प्रोडक्ट घेणे बंधनकारण केल्याने विक्रेत्यांना ते प्रॉड क्ट घ्यावेच लागते. अन्यथा त्यांना युरिया खत मिळत नाही.हा प्रश्न केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी मर्यादित आहे.

– श्री अनिल थोरात, मॅनेजर संगमनेर शेतकी संघ

हेही वाचा

SCROLL FOR NEXT