अहमदनगर

नगर : राज्यस्तरीय समितीची मढीला भेट

अमृता चौगुले

मढी : पुढारी वृत्तसेवा :  स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातून आलेल्या राज्यस्तरीय समितीने पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी गावाची पाहणी केली. गावातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यासह स्वच्छतेची समितीने पाहणी केली.समितीने कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, काही सूचनाही केल्या. यावेळी नागपूर जिल्ह्यातील कमिटीतील सदस्य श्वेता महाले, आशिष रोळे, अंजली पाटणकर, सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, ग्रामसेवक अनिल लवांडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मढी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र घनकचरा व्यवस्थापन आदी ठिकाणांच्या शौचालयांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक पाणवठ्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विचारलेल्या स्वच्छता संदेशाबाबतची उत्तरे मुलांनी तत्परतेने दिली. तसेच प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया घेऊन प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.
मढी ग्रामपंचायतीने गावपातळीवर राबविलेला नाविन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली. राज्यात आदर्श गाव म्हणून श्री क्षेत्र मढी आगामी काळात होईल. त्यासाठी मढी ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित असून वैयक्तिक, तसेच सामूहिक शौचालयासाठी जागृती करुन लोकसहभाग वाढून विविध विकासकामे राबवण्यात येत असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT