अहमदनगर

इफ्तार पार्टीमुळे सामाजिक सलोखा : माजी आ. मुरकुटे

Laxman Dhenge

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : रमजान मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना आहे. या महिन्यात सामाजिक एकोपा निर्माण करण्याकरिता इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. यामुळे समाजात एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते. असे कार्यक्रम झाल्यास देशामध्ये धार्मिक व सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहिल, असे मत अशोक कारखान्याचे चेअरमन, माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले.

येथील जामा मस्जिद येथे लोकसेवा विकास आघाडी आयोजित इफ्तार पार्टीप्रसंगी मुरकुटे बोलत होते. यावेळी जामा मस्जिदचे खतीबू इमाम हजरत मौलाना इमदाद अली, मोहम्मद तन्वीर रजा, मौलाना शहानुर, हाफिज मुस्लीम, हाफिज वजहूल कमर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड. सुभाष चौधरी, लोकसेवा आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, कारखाना उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, नाना पाटील, मुळा- प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, मुख्तार शाह, कलीम कुरेशी, रियाज पठाण, रज्जाक पठाण, रफिक बागवान, आशिष दोंड, आदींनी इफ्तार पार्टीत सहभाग घेतला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT