अहमदनगर

राहुरीत शेकडो बालकांना उपचार मिळाल्याचे समाधान : आ. तनपुरे

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : समाजातील अनेक बालके हृदय व शारीरिक व्यंगाच्या व्याधिंनी त्रस्त आहेत. मोठ्या शहरात हॉस्पिटलमध्ये जावून उपचारासाठी लाखो रूपये आणायचे कसे, हा प्रश्न गोरगरीब पालकांना भेडसावतो. ही समस्या सोडविण्यासाठी गोरगरीब पालकांना मदत म्हणून मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलचे उच्च पदस्थ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आयोजित केलेल्या शिबिराला उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहून समाधान झाल्याचे प्रतिपादन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी शहरात स्नेहपुंज लॉन्समध्ये लहान बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. यावेळी आ. तनपुरेंसह माजी खा. प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, रविंद्र आढाव, सुरेशराव निसमे, डॉ. प्रियंका प्रधान, डॉ. योगेश शेखावत, डॉ. चिंतन व्यास, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंदाराणी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, बाळासाहेब लटके, डॉ. सचिन पोखरकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रितम चुत्तर, डॉ. सुलभा गाडे, डॉ. सागर गडाख आदी उपस्थित होते.

यावेळी आ. तनपुरे म्हणाले, मुंबई येथील एमआरसीसी हॉस्पिटलमध्ये ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांना भेटण्यास शेकडो मैलांचा प्रवास करून तासन्- तास थांबावे लागते, ते वैद्यकीय अधिकारी शिबिरानिमित्त आपल्याकडे आले. लाखो रूपयांचे उपचार मोफत होणार आहेत. हृदयरोग, छिद्र, सूज, झडपेचे आजार, अस्थीरोग, पाय, घोटा, गुडघा, हीप, मणका विकृती, हाड व सॉफ्ट टिशू, ट्यूमर, फ्रॅक्चर व डिस्लोकेशन, स्पोर्ट इंजरी, स्पाईना बिफिडा, मानेत सूज, मांडीचा सांधा, फाटलेल्या ओठांची सर्जरी, दुभंगलेले टाळू आदींवर मोफत शस्त्रक्रिया व उपचारांसाठी शिबीर आयोजित केले.

गरजू पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू..!

मोफत शस्त्रक्रिया होणार असे समजताच गरजू पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शिबिरामध्ये 260 व्याधिग्रस्त बालक आले. अस्थिरोग 85 पैकी 35 बालकांची शस्त्रक्रिया, हृदयरोग 65 पैकी 28 शस्त्रक्रिया, बोनमॅरो 22 बालकांची तपासणी तर इतर शस्त्रक्रियांसाठी 25 बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे सांगण्यात आले. 5-10 लाखावर खर्चाच्या शस्त्रक्रिया शिबिरात मोफत होणार असल्याने पालक आनंदले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT