संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहरात दोन दिवसांपूर्वी काढलेल्या निळा आक्रोश मोर्चाच्या २१ आयोजकांसह १०० ते १२५ जणांवर पोलीसात३ ७/१ चे उल्लंघन तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भातील अक्षय भालेराव आणि हिना मेश्राम यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ संगमनेरात आंबेडकरी जनतेच्यावतीने निळा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये आयोजकांनी जोरजोराने घोषणा दिल्या म्हणून किशोर सुदाम चव्हाण (रा. दिल्लीनाका, संगमनेर), अशीष प्रभाकर शेळके (रा. उंबरी बाळापुर ता. संगमनेर), किरण सुधाकर रोहम (रा. पिंपरणे ता. संगमनेर), प्रविण देवेंद्र गायकवाड (रा. समनापुर ता. संगमनेर), राजु यादव खरात (रा. घुलेवाडी ता. संगमनेर), बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड (रा. वडगांवपान ता. संगमनेर), शशीकांत विनायक दारोळे (रा. ढोलवाडी बुध्द विहार), संदिप मोकळ (रा. पारेगाव ता. संगमनेर), रामदास दादु दारोळे (रा. राजवाडा पुणारोड), कैलास राजाराम कासार (रा. देवाचामळा संगमनेर), रवि अरुण गिरी (रा.घुलेवाडी ता. संगमनेर), पप्पु आकाश अर्जुन गोडगे (रा. इंदिरानगर ता. संगमनेर), माणीक दाजिबा यादव (रा. जोर्वे ता. संगमनेर), रामदास सुराळकर (रा. राजापुर), दिपक रणशेवरे (रा. संगमनेर), संध्या खरे (रा. अकोलेनाका संगमनेर), विजय वाकचौरे (रा. अकोले), मंजाबापु साहेबराव साळवे (रा. जाखुरी) अजिज वोहरा (रा. संगमनेर), सुनिल रमेश रुपवते (रा. माधव थिएटर जवळ), किशोर दादु वाघमारे (रा. संगमनेर) आणि इतर 100 ते 125 जणांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: