Gurupournima Celebratation Saibaba Mandir Shirdi
साईबाबा संस्थानात गुरुपौर्णिमेची उत्साही वातावरणात सुरुवात  Pudhari File Photo
अहमदनगर

Guru Pournima : श्री साईबाबा संस्थानात गुरुपौर्णिमेची उत्साही वातावरणात सुरुवात

करण शिंदे

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : शिर्डीमध्ये शनिवारी (दि.20) गुरुपौर्णिमेची सुरुवात उत्सवाहात झाली आहे. या सोहळ्याच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या पाचवा अध्याय वाचन करुन केला.

उत्सवाचे निमित्ताने मा.जिल्‍हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्‍य ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. मिनाक्षी सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे व विश्‍वनाथ बजाज तसेच मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली.

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाचे पहिल्‍या दिवशी अमेरीकेचे वाणिज्‍य महादुतावास श्रीयुत माईक हॅंकी यांनी श्री साईबाबांच्‍या मध्‍यान्‍ह आरतीला हजेरी लावली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.श्री मंदार व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा मंदिराचे उत्‍तर बाजुकडील स्‍टेजवर संपन्‍न होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्‍वरधुणी साई गीतांचा कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्न होईल. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल. तसेच पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडे ठेवण्‍यात येईल.

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार २१ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व दुपारी ०१ ते ०३.०० यावेळेत श्री संजीव कुमार, पुणे यांचा भजन संध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल.

रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री निरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व सोमवार २२ जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

SCROLL FOR NEXT