शिर्डी : द्वारकामाईत चमत्‍कार? साईभक्‍तांची अलोट गर्दी

शिर्डी : प्रतिनिधी

शिर्डीतील द्वारकामाई (मशिदीत) मधील पश्चिमेकडील भिंतीवर बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाची पुसटशी प्रतिमा दिसू लागल्याचा दावा साई भक्तांनी केला. याच समजुतीतून साईभक्तांकडून याचा सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार झाल्याने भाविकांची गुरुवारी दि. १२ जुलै रोजी पहाटेपासून एकच झुंबड उडाली होती. 

साईभक्तांमध्ये अशी समजूत आहे की, साईबाबांनी सांगितले आहे, माझ्या भक्तांना मी जिथे हवा असेल, तिथे तिथे येईल, असे वचन दिले आहे. म्हणूनच २०१२ साली शिर्डीच्या द्वारकामाईमध्ये शेजारती चालू असताना एका भक्तास बाबांची पांढर्‍या रंगात त्याच पश्चिमेकडील भिंतीवर छबी दिसल्याची समजूत झाली होती. त्यावेळीही भाविकांनी अशीच रिघ लावली होती. त्यानंतर द्वारकामाईमध्ये आजही साईबाबा राहतात, अशी भावना साई भक्तांमध्ये आहे. याच भावनेचे बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास प्रत्यंतर आले आहे. बाबांची हसरी छबी द्वारकामाईमध्ये दिसू लागल्याचा दावा भाविकांनी केला. बघता बघता हे वृत्त सोशल मीडियावर पसरले.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news