अहमदनगर

नगर तालुका महाविकास आघाडीला आणखी एक धक्का ; काँग्रेसचे रावसाहेब शेळके भाजपात

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके यांनी रविवारी (दि.24) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पोखर्डी (ता. नगर) येथे भाजपच्या पदाधिकारी संवाद कार्यक्रमात शेळके यांचा जाहीर प्रवेश झाला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसमय घराणे म्हणून ओळख असलेले शेळके कुटुंबिय भाजपवासी झाल्याने तालुक्यात महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच रावसाहेब शेळके यांचा मुलगा अंकुश शेळके याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पित्रा-पुत्र दोन्हींनी भाजपमध्ये आले आहेत. शेळके कुटुंबियांची देहरे गटासह नगर तालुक्यात चांगली पकड असून, याचा फायदा भाजपला होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रावसाहेब शेळके यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SCROLL FOR NEXT