श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरा जवळ असणार्या परिसरात असलेल्या हातभट्टयांवर पोलिसांनी छापे मारीत 10 जणांवर गुन्हे दाखल केले. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 62 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. रोहित गोडाजी पवार (अशोकनगर), संपन नाना राऊत (निपाणी वाडगाव), सुनीता रमेश पिंगळे (अशोकनगर), काकासाहेब कदम (अशोकनगर), बादल पंडित चव्हाण (अशोक कारखाना), शकीला जावेद मुरारी (राऊत वस्ती), सविता आनंद पिंपळे (कारेगाव रोड), गुलाब मुक्ताजी मापारी (निपाणी वाडगाव), गणेश संजय वायकर (वडाळा महादेव), राधाबाई राजेंद्र काळे (वडाळा महादेव) असे गुन्हे दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पकडलेले आरोपी हे गावठी दारूबरोबर भिंगरी, बॉबी देशी दारूची अवैध विक्री करताना आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरानजिक अनेक अवैध दारू विक्री करताना आढळून येत आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा