अहमदनगर

मानव सेवा प्रकल्पात पदोन्नतीचा कार्यक्रम

Laxman Dhenge

बेलवंडी : पुढारी वृत्तसेवा: मानवी तस्करी विरोधी दिनांचे औचित्य साधून अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानव सेवा प्रकल्पात पदोन्नती मिळालेल्या बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, परीविक्षाधीन अधिकारी जीवन, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते. बेलवंडी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानांतर्गत सुटका केलेल्या वेठबिगार्‍यांना मानव सेवा प्रकल्पात दाखल केले.

त्यांच्याच हस्ते नंदकुमार पठारे, भाऊसाहेब यमगर, कविता माने, सुजाता गायकवाड, शोभा काळे यांना पदोन्नतीची फित लावत सन्मानित करण्यात आले. यावेळी पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्‍यांतर्फे मानव सेवा प्रकल्पातील सर्व मनोरुग्णांना सुरुची भोजन देण्यात आले.
याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, मानव सेवा प्रकल्पाचे मार्गदर्शक संजय शिगवी, सराज शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव कातोरे यांनी केले. पोलिस हवलदार हसन शेख यांनी आभार मानले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कौतुक

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ऑपरेशन मुस्काअंंतर्गत आतापर्यंत तब्बल तेवीस वेठबिगारांची सुटका केली. त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले. सामाजिक बांधिलकीतून या वेठबिगारांच्या पुनर्वसनाचे हाती घेतलेले काम कौतुकास्पद असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT