अहमदनगर

रुईछत्तीशी : गुंडेगाव परिसरात विजेचा लपंडाव

अमृता चौगुले

रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गुंडेगाव (ता. नगर) येथील विजेचा लपंडाव चार-पाच दिवसांच्या अंतराने चालू आहे. यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातील विजेचा पुरवठा दिवसातून चार-पाच वेळा गायब होत आहे. तसेच, शनिवारी (दि.24 ) दिवसाच्या आठ ते नऊ तास वीज गायब होती. रविवारी दिवसा व रात्री वीज गायब असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वीज कर्मचार्‍यांना याबाबत विचारले असता विद्युत तारा तुटणे, लाईट स्ट्रीफ होणे, पुरवठा कमी झाला आहे, अशी पर्यायी उत्तरे ऐकायला मिळत आहेत. यात गावांमध्ये बहुतेक तारा झाडांच्या विळख्यात असल्याने काही ठिकाणी तारा जमिनीपासून जवळ लोंबताना दिसतात.

अशातच वादळी वार्‍यासह पाऊस पडत असल्याने झाडांच्या फांद्या त्यामध्ये गुंतुन पावसामध्ये विद्युत प्रवाह बंद होतो. काही बिघाड झाला, तर ती दुरुस्त करणे जोखीमेचे होते. वारंवार होणारा खंडित वीजपुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळाल्यास अथवा बिघडल्यास याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतो. अधून-मधून किंवा सतत पडणार्‍या पावसामुळे तातडीने याचा विचार करून योग्य ते पावले उचलावी, जुन्या झालेल्या तारा नव्याने पुन्हा चांगल्या दर्जाच्या टाकण्यात याव्यात याबाबत ग्रामपंचायत व महावितरण विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, विजेचा लपंडाव थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली.

काही दिवसांपासून गुंडेगाव येथे लाईटचा लपंडाव चालू आहे. गाव सुन्न लकवा मारल्यासारखे दिसते. लाईट नुसतीच अधून-मधून बंद होते. गावामधील नियुक्त विद्युत कर्मचार्‍यांना कोणत्याच समस्या वेळेत सोडवता येत नाहीत. नागरिक त्यांना वेळोवेळी मदत करतात; परंतु लाईटची अडचण सुरळीत होत नाही, यात नेमका दोष कोणाचा हे न समजण्यासारखे आहे. यात ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी लक्ष देऊन लाईट सुरळीत कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– दादासाहेब आगळे, गुंडेगाव काही दिवसांपासून गुंडेगाव येथे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT