अहमदनगर

भंडारदर्‍यात चार दिवस राहणार एकेरी वाहतूक

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यदिन दरम्यान सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच पावसामुळे रस्ते खराब झाले असुन रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि.13 ते 16 हे चार दिवस एकेरी वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांनी दिली आहे. मुळा प्रवरा पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर श्रावणसरी चा शिंडकावा, घनदाट झाडी आणि घाट वळणाच्या रस्त्यामुळे मनमुराद आनंद देणारा विस्तृत जलाशय, पावसाळ्यात वारंवार धुक्यात हरवणारा घाटघर, साम्रद परिसर, हिरवाईने नटलेली सह्याद्रीची डोंगररांगा अशा वेगवेगळ्या कारणांनी हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो.

हरिश्चंद्रगड व कळसुबाई शिखर यांच्या पायथ्याशी असलेल्या मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून सध्या तुरळक केवळ श्रावण सरीचा बरसत आहे. मुळा प्रवरा पाणलोटात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. त्यात स्वतंत्र्यदिन दरम्यान चार दिवस सलग सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

दि.15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर भंडारदर्‍यात पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई व अहमदनगर जिल्यातुन बहुसंख्येने पर्यटक येतात. तर भंडारदरा धरण परिसरात मध्ये दारु पिऊन धांगडधिंगा घालणार्‍यांमुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना घडत आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून राजुर पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. रविवारी दि. 13 सकाळी 8 वाजता राजुर पासुन भंडारदर्‍याकडे जाण्यासाठी रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर भंडारदर्‍याला जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश करता येईल.

वाहतूक मार्गात झालेला बदल
वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिंचोडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण, स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा मार्ग इच्छित स्थळी जातील. तसेच या एकेरी वाहतुकीतून अ‍ॅम्बुलन्स, अग्निशामक दल, शासकीय वाहने यांना एकेरी वाहतुकीचे नियम राहणार नाही. तर भंडारदरा धरण परिसरात पाटबंधारे विभागाचे सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याची माहिती शाखा अधिकारी अभिजीत देशमुख यांनी दिली. तुम्हाला दिलेले झाड जगले की नाही? याचा जाब विचारा आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरी शौचा लय असलेच पाहिजे नसेल तर मी प्रथम ते बांधील, अशी गगनगिरी महाराजांच्या चरणी शपथ घ्या असाही मोलाचा संदेश आदर्श हिवरेबाजार गावचे माजी सरपंच व आदर्श गाव योजनेचे माजी कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी जाखुरीकरांना दिला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT