नेवासा : पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही ऊस दर जाहीर केलेला नाही. ऊसउत्पादक शेतकर्यांना कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी 12 वाजता नगर-संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाट्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. उसाच्या रसापासून इथेलॉन निर्मिती करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली. तसेच कांदा निर्यात बंदी केली.
त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, गणपत मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे, राजेंद्र वाघमारे, काँग्रेसच्या स्वयंरोजगार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शोभा पातारे, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, अशोक नागोडे, संघटनेचे कायदेशीर सल्लागार बाळासाहेब कावळे, पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी बद्रिनाथ चिंधे, रमेश मोटे,सतीश लंघे, किरण लंघे, नरेंद्र पाटील काळे, कल्याण काळे, विजय मते, विश्वास मते आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा