अहमदनगर

Nagar News : नगरचा मल्ल महाराष्ट्र केसरी होईल : आमदार जगताप

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : कुस्ती खेळाला चांगले दिवस आले असून, मल्लांना आता शासकीय नोकरीत संधी दिली जात आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मल्ल चांगली कामगिरी करतील व नक्कीच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवून देतील, असे प्रतिपादन जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध वजन गटातील 200 मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने नगर शहरातील टी. व्ही. सेंटर जवळील गंगा उद्यान मागील खेळाच्या मैदानावर नियोजनबद्ध पद्धतीने माती व गादी विभागात निवड चाचणी स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार जगताप बोलत होते. उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपाध्यक्ष अर्जुन शेळके, सचिव संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, शिवाजी कराळे, बबनराव काशिद, बापूसाहेब थेटे, युवराज करंजुले, पांडुरंग गुंजाळ, उमेश भागानगरे, अफजल शेख, प्रा. माणिक विधाते, अविनाश घुले, गुलाब बर्डे, तुकाराम पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT