अहमदनगर

Nagar News : खर्डा येथील जनसुविधा केंद्र हलविले

Laxman Dhenge

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा आणणारे जनसुविधा केंद्राची इमारतीचे काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी व ग्रामस्थांच्या विरोधामुळे थांबविण्यात आले. ही इमारत आता दुसरीकडे हलविण्यात आली आहे. यासंदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना व ग्रामस्थांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना जाग येऊन त्यांनी तहसीलदार व शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडू राजेभोसले यांच्यासमवेत किल्ला परिसराला भेट देऊन पूर्वीच्या ठिकाणापासून 25 मीटर लांब हलविले.

पर्यटकांच्या सोयीसाठी जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून बांधकामास सुरुवात झाली होती. परंतु खर्डा ग्रामस्थांच्या विरोधानंतर सदरचे बांधकाम थांबविण्यात आले होते. खर्डा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यासमोर तब्बल एक कोटी वीस लाख रुपये खर्चून जनसुविधा केंद्राच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, हे बांधकाम खर्डा किल्ल्यासमोर सुरू झाल्याने किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीचा ऐशी टक्के भाग या इमारतीने झाकला जाण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडूराजे भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, तहसीलदार योगेश चंद्रे, पुरातत्व विभागाचे जतन सहायक विजय धुमाळ, जनसुविधा केंद्राचे अभिंयता अर्जुन चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, राष्ट्रवादी जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, सरपंच संजीवनी पाटील, ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर, शिवभक्त धारकरी बबलू निकम, संकेत सातपुते, रुद्रा हुंबे, सोनाजी सुरवसे, गणेश ढगे, धीरज कसबे, शेखर सकट, योगेश सुरवसे, प्रदीप टापरे, ओंकार इंगळे, घनश्याम राळेभात, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ मेहेत्रे, गणेश जोशी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT