अहमदनगर

संगमनेर : आगामी निवडणुकांसाठी कामाला लागावे : खा. सदाशिव लोखंडें

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, ज्या ठिकाणी काम करताना काही अडचणी आल्या तर सांगा, त्याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिवसैनिकांना दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वे नगर जिल्हा पक्षनिरी क्षक प्रशांत काळे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये शिवसेनेची ध्येय धोरण जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत खा. लोखंडे बोलत होते.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तरनगर जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते , जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे, तालुकाप्रमुख रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, अल्पसंख्यांकचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, उपजिल्हा प्रमुख रणजीत ढेरंगे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख अरुण उदमले, बाळासाहेब राऊत, विकास भरीतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. लोखंडे म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी अवघा 8 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मतदारसंघ मोठा असल्यामुळे या मतदार संघासाठी तो निधी पुरेसा नव्हता. मात्र महाराष्ट्राची चित्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात घेतल्यानंतर या शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी अवघ्या दीडच वर्षात 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

त्यामुळे मला या मतदारसंघामध्ये चांगली कामे करता आली तसेच शिर्डी लोकसभा मतदारांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले निळवंडे डाव्या कालव्याचे काम सध्याच्या महायुती सरकारच्या माध्यमातून डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.

उजव्या कालव्याचेही काम प्रगतीपथावर आहे, ही दोन्ही कालवे पूर्ण झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागेल. यातच मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस शिवसेना युवासेना महिला आघाडी अल्पसंख्यांक सेना वाहतूक सेना शेतकरी सेना यांच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासन योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी काम केले असून त्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केले आहेत. या सर्व योजना आगामी काळात सर्वसामान्य तळागाळातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहो चविण्याचे काम शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व शिवसैनिकांनी करावे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या योजना राबविल्या आहेत, त्या तळागाळातील शेवटच्या घट कापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेने च्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आदेश पक्ष निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT