अहमदनगर

चार दिवसांत दोनदा विनयभंग ; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : भाड्याने घेतलेले घर खाली करुन घेण्यासाठी आलेल्यांनी चौघांनी घरात शिरुन पीडितेच्या पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग करण्यांची घटना घुलेवाडी परीसरात घडली. अवघ्या चार दिवसांत एकाच महिलेवरती हा प्रसंग ओढवली. याबाबत शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची मध्यरात्री नोंद करण्यात आली असून शहर पोलिसांनी चौघांविरोधात विनयभंगासह मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्ह्या दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडी शिवारातील एका दाम्पत्याचा बंगला भाड्याने देण्यात आला आहे. काही दिवसांपासून घरमालकाने बंगला खाली करुन द्यावा यासाठी भाडेकरूकडे तगादा लावला असून त्यातून त्याच्याकडून तब्बल दोनवेळा विनयभंगाचा प्रकार घडला. या प्रकरणी मंगळवारी (ता.4) रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्याच्यासह इतर तिघांवर दुसर्‍याा गुन्ह्याची नोंद झाली आहे.

शनिवारी भाडेकरी दाम्पत्य बंगल्याचे प्रवेशद्वार उघडून आत जात असतांना चौघांनी 'आमचे घर खाली करा!' असे म्हणत शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. चौघांनीही पीडितेच्या पतीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करताना महिला पतीला वाचवण्यासाठी गेली असता आरोपी प्रदीप रहाणे व सुदामा मुखेकर यांनी महिलेचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT