अहमदनगर

पाथर्डी : मोदी 9 उपक्रम यशस्वी करावा : आमदार मोनिका राजळे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वीरित्या नऊ वर्ष पूर्ण केल्याबद्दल देशभर 30 मे ते 30 जून दरम्यान 'मोदी 9' उपक्रमाचे आयोजन केले असून, विधानसभा मतदारसंघात 16 ते 30 जून दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघात जनजागृती करून मोदी सरकारच्या 9 वर्षातील कल्याणकारी योजनांची व कामाची माहिती दिली जाणार आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे अवाहन आमदार मोनिका राजळे यानी केले.

शहरातील आमदार जनसंपर्क कार्यालयात मोदी 9 उपक्रमाच्या नियोजनासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, अशोक चोरमले, नंदकुमार शेळके, धनंजय बडे, अमोल गर्जे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, संचालक अजय रक्ताटे, नारायण पालवे, प्रदीप पाटील, राहूल कारखेले, काशिबाई गोल्हार, मंगल कोकाटे, महेश बोरूडे, भगवान साठे, संदीप पठाडे, जगदीश काळे, राजेंद्र साप्ते, अविनाश फुंदे, संदीप पालवे, ललित खेडकर, सोमनाथ अकोलकर, महेश हजारे, हर्षद गर्जे आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 9 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

16 जून रोजी वसंतराव नाईक चौकात नवमतदार नोंदणी अभियान, 21 जून रोजी बाबुजी आव्हाड महाविघालयात जागतिक योग दिन, दुचाकी रॅली, 23 जून रोजी टिफीन बैठक, आप्पासाहेब राजळे सभागृहात व्यापारी संम्मेलन, 24 जून रोजी आप्पासाहेब राजळे सभागृहात लाभार्थी संम्मेलन, 25 जून रोजी 'मन की बात' कार्यक्रम होणार आहेत. सचिन वायकर यांनी प्रास्ताविक केले. जे. बी. वांढेकर यांनी सूत्रसंचालन केले. अजय भंडारी यांनी आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT