धानखरेदी गैरव्यवहार 
अहमदनगर

प्रेमविवाह केलेल्या मुलीची आईला धक्क्काबुक्की; अशी घडली घटना

Laxman Dhenge

घारगाव : पुढारी वृत्तसेवा : दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जावून पिंपळदरी येथील तरुणाशी प्रेम विवाह केलेली मुलगी दीड महिन्यानंतर कागदपत्र नेण्यासाठी माहेरी आली. आईने कागदपत्र न दिल्याने मुलीने आईला मारहाण केली. यावेळी वडिलांनी रागाच्या भरात मुलीला चापट मारल्याने मुलीने सासरच्या काही मंडळीसह नातेवाईकांना आणून, घरात जमावासह घुसून उचकापाचक करीत आई, वडिलासह भावाला जबर मारहाण केली.

दरम्यान, या झटापटीत घरातील सोने व रोकड गहाळ झाली आहे. रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. वनकुटे गावात 40 वर्षीय शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. त्यांची मुलीने दीड महिन्यापूर्वी (पिंपळदरी, ता. अकोले) येथील सुदीप भोजने या तरुणाशी आई- वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेम विवाह केला. रविवारी ती मुलगी कागदपत्र घेण्यासाठी वनकुटेत आली. आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्याने तिने आईला काठीने मारहाण केली. पिडीत आईने हा प्रकार पतीस सांगितला. पती तत्काळ घरी आले. यावेळी मुलगी पुन्हा घरी आली. वडिलांनी रागाच्या भरात तिला चापट मारुन, सांगितले की, 'तू पुन्हा येथे येऊ नको.' यावेळी पिडित महिलेचा पती व मुलगा घराजवळ असताना रंजाबाई राजाराम हांडे (रा. वनकुटे), भिकुबाई भाऊसाहेब भोजने (रा. पिंपळदरी, ता. अकोले), सुवर्णा राजू सातपुते (रा. संगमनेर), फुला विकास कोरडे (रा. घारगाव, ता. संगमनेर), तावडी अमोल बोरचाटे (रा. पुणे) यांनी पिडीत महिलेचे केस पकडून खाली पाडून, शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, पिडीत कुटुंब घरात गेले असता राजाराम रभाजी हांडे (रा. वनकुटे), राजू सातपुते (रा. संगमनेर), विकास कोरडे (रा. घारगाव), भाऊसाहेब भोजने (रा. पिंपळदरी) ,बाबू राजाराम हांडे (रा.वनकुटे) तेथे आले. त्यांनी पिडीत महिलेच्या पतीस दरवाजातून बाहेर ओढून मारहाण केली. घरातून पिडितेच्या पतीचे पावणे दोन लाख रुपये गहाळ झाले. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT