पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यात गुरुवारी सकाळी धुके दाटल्याने सूर्यनारायणाचे दर्शन पाथर्डीकरांना उशिरा झाले. रात्रीपासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत धुके पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. धुक्यात नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. रस्त्यावर सकाळी संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, साडेनऊनंतर सूर्याची किरण पडल्याने पुन्हा एकदा दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाले.
सकाळची शाळा असल्याने चिमुकल्यांसह विद्यार्थ्यांना या धुक्यासह थंडाची सामना करावा लागला. या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या आजाराला चिमुकले बळी पडली. धुक्यामुळे रस्त्यावर वाहने चालवणे कसरतीचे झाले होते. धुक्याचा विपरित परिणाम शेती पिकांवर झाला आहे. कांदा पिकाचे नुकसान होणार आहे. दोन ते चार दिवसांपासून वातावरणात वेगवेगळे बदल होत आहे. धुक्यापूर्वी गहू व हरभर्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.धुक्यापासून बचाव करण्यासाठी शेतकर्याला कांदा व अन्य पिकांवर औषध फवारणी करावी लागणार आहे.
हेही वाचा