कोपरगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: वाळूची चोरून वाहतूक करणार्या डंपरवर पोलिसांनी गुरुवारी (दि.1) पहाटे चार वाजता शहरातील टाकळी नाका परिसरात कारवाई करत पकडला आहे. या कारवाईत 10 लाखांचा डंपर (एमएच 6 बीडब्लू 2290) व 50 हजार किमतीची 10 ब्रास वाळू, असा तब्बल 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी बाळासाहेब धोंगडे यांनी चालक संतोष विलास इंगळे (रा.पढेगाव, ता. कोपरगाव), व क्लीनर सुहास मच्छिंद्र वाघमारे (रा. परजणे वस्ती, ता. कोपरगाव) यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कोपरगाव शहरातील गोदावरी नदी पात्रात लहान पुलाजवळ दिवसा वाळू उपसा करून मुक्या प्राण्यांच्या सहायाने वाहतूक केली जात आहे. याकडे मात्र महसूल अन् पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाळू चोरीच्या घटना थांबाव्या म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार सर्वत्र शासकीय वाळू डेपो उभारले जात आहेत. नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून दिली जात आहे. असे असताना कोपरगाव तालुका परिसरात शासनाचा वाळू उपशाचा कोणताही ठेका देण्यात आलेला नाही. तरीही रात्रीअपरात्री वाळूचा बेकायदेशीर उपसा आणि वाहतूक सुरू आहे.
हेही वाचा: