अहमदनगर

कामोठीत रंगणार दहीहंडीचा थरार; मुंबई स्थित पारनेरकरांतर्फे आयोजन

अमृता चौगुले

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील कामोठेत स्थाईक पारनेरकरांतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून, आज (दि.7) संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर परिसरात वेगवेगळे गोविंदा पथक थर लावणार आहेत. पारनेर तालुक्यातील अनेक जण मुंबई व उपनगरात व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. कामोठे येथे पारनेरकरांचे अडीच हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. हे सर्वजण संघटित झाले असून, त्यांनी पारनेर रहिवासी संघाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून दहीहंडी उत्सव आयोजिला आहे. कामोठे येथील सेक्टर 36 येथे पारनेर रहिवासी संघाची दहीहंडी लावण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या बक्षीसांची खैरात करण्यात आली, ही माहिती नीलेश आहेर यांनी दिली.

होम मिनिस्टरचाही खेळ

गोपाळकालानिमित्त 'होम मिनिस्टर खेळ मांडला' कार्यक्रमाचे आयोजन केले असून, निवेदक उत्तम घोलप आहेत. महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यासाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती राहुल आग्रेंनी दिले.

पथकांना पाच लाखांचे बक्षीस

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील नामांकीत गोविंदा पथकांना निमंत्रित केले आहे. त्यानिमित्त पारनेर रहिवासी संघाने विजेत्या गोविंद पथकांना मोठे बक्षीस ठेवले आहे. यामध्ये विजेत्याला गोविंदा पथकाला पाच लाख 55 हजार 555 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती आयोजक भाऊ पावडे, कुंडलिक वापरे यांनी दिली.

महिला पथकांचा थरारही!

पारनेर रहिवासी संघातर्फे महिलांसाठी दहीहंडी लावण्यात येणार, यासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे. याकरिता मुंबईतील मानाच्या पथकांना निमंत्रित केल्याचे कृष्णा ढोमे यांनी सांगितले.

दहीहंडीचा कार्यक्रम असा
सकाळी नऊ वाजता दहीहंडी पूजन, छत्रपती शिवाजी महाराज आरती
दहा वाजता गोविंद पथकांची सलामीला सुरुवात
सायंकाळी मानाची पदके थर लावणार
संगीत भजन, त्याचबरोबर आर्केस्ट्रा व सांस्कृतिक कार्यक्रम

हेही वाचा

SCROLL FOR NEXT