अहमदनगर

जवळा : जलजीवनच्या कामात ठेकेदारांकडून रस्त्यांचे मरण

अमृता चौगुले

जवळा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळे, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजिभोयरे आदी ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्याचे काम जोरात चालू असून, ठेकेदार मंडळी कच्चेपक्के डांबरी रस्त्यांच्या साईड पट्ट्या, धडाधड तोडून पाईपलाईन टाकण्याचे काम करतात. त्यांनी रस्त्यांच्या बाबतीत कोणत्याही नियमांचे पालन न करता किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या न घेता बेमालूम कामे चालू आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी व्यवस्थित पुन्हा माती न भरता कामे उरकण्याचा सपाटा लावला आहे.

यामुळे आनेक ठिकाणी डांबरी रस्ते तुटले आहेत, तर काही ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होत असून, तालुक्यात जवळ जवळ छत्तीस गावात जलजीवनची योजना सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने सुरक्षित अंतर ठेऊन खोदकाम करण्या ऐवजी रस्त्याच्या अगदी कडेवर खोदकाम केले जात आहे. यामुळे रस्ते नादुरूस्त होत आहेत. रस्त्यावर माती, खडे, दगड पडत आहेत. मोठ मोठे खड्डे रस्त्याच्या बाजूला झाल असून, काही ठिकाणी नुकतेच बनवलेले रस्ते तुटल्याने व खड्डे पडल्याने दुर्घटना घडू शकते.

वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला : तपोले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या कडेने काम करण्याची कोणतीही परवानगी ठेकेदाराने घेतली नसून, कामे चालू आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयास आपण पत्रव्यवहार केला आहे. आनेक वेळा रस्त्यांच्या नादुरुस्तीची बाब जलजीवन अधिकार्‍यांच्या व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, सोयीस्करपणे दुर्लक्ष करत कामे चालू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश तपोले यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT