अहमदनगर

सुखाची, समृद्धीची, उंच उभारू गुढी : आमदार संग्राम जगताप

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून आपल्या दारी उभारलेली गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. सन उत्सवाच्या मध्यामातून आपल्याला महान परंपरा व संस्कृती लाभली. तिचे जनत करण्यासाठी आपण सर्वांगीण विकासाची, सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी माणिकराव विधाते, वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, दिनेश जोशी, प्रतिष्ठानचे देविदास मुदगल, गणेश लाटणे, भूषण झारखंडे, रवी बागल, विनोद ऊनेचा, राहुल म्हसे,विशाल पवार,शुभम दस्कन, गोविंदा नामन, शिवा वराडे, तानाजी देवकर,ओम भोसले, श्रीराम जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT