पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पारनेर तालुक्यात पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांची जिल्हा परिषद माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्रित येत त्यांना निरोप दिला. या प्रसंगी बुगे यांना भेट म्हणून मोटरसायकल देण्यात आली. शिक्षकांनी दुतर्फा उभे राहूण त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विनेश लाळगे होते. तालुक्यातील प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी बुगे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे गेली पाच वर्षे शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमध्ये पारनेर तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
बाळासाहेब बुगे म्हणाले, आपण अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेले असून प्राथमिक शिक्षकांमधून गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचलो. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न व समस्या यांची जाण असल्याने पारनेर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करता आले. यावेळी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदर्श शिक्षक अंबादास काकडे व मिनल शेळके यांचा मुलगा कौस्तुभ काकडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिक्षक नेते रा. या. औटी, प्रवीण ठुबे, गोकुळ कळमकर, चंद्रकांत मोढवे, लक्ष्मण चेमटे, नाना आगळे, दिलीप बेलोटे, स्वाती शिंदे, कांता बनकर, विस्तार अधिकारी संभाजी झावरे, गेणूजी नरसाळे, केंद्रप्रमुख दौलत येवले, केसकर क्षीरसागर, सुनील दुधाडे, संतोष खामकर, शिक्षक बँक संचालक कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, गोवर्धन ठुबे, संजय रेपाळे, युवराज हिलाळ, मंगेश खिलारी, बाळासाहेब रोहकले, बाळासाहेब सालके, उपस्थित होते. शिक्षक नेते विजय काकडे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पोटे व छाया मापारी यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा