अहमदनगर

सोनई : वारकर्‍यांची सेवा करणारे गडाख पुण्यवान

अमृता चौगुले

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी नेवासा तालुक्यातील विविध गावांमधून जाणार्‍या 90 दिंडी सोहळ्यांना आमदार शंकरराव गडाखांनी प्रत्येकी पाच हजार रुपये किंमतीचे सतरंजी व ताडपत्रीचे वाटप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, सुनीलगिरी महाराज, गणेशानंदगिरी महाराज, कारभारी महाराज झरेकर यांच्या हस्ते व आमदार गडाखांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी 90 दिंडीमधील वारकरी, महाराज उपस्थित होते. सुनीलगिरी महाराज म्हणाले, धार्मिक, अध्यात्मिक कार्यात सहभागी होऊन मदत करण्यासाठी आमदार गडाख नेहमी प्रयत्नशील असतात.

आमदार गडाखांनी उपस्थित संत, महंत वारकरी मंडळींचे स्वागत केले. वारकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य लाभले याबद्दल आमदार गडाखांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी, कष्टकर्‍यांना हे वर्ष भरभराटीचे जावो म्हणून गडाखांनी ांडुरंग चरणी प्रार्थना केली. यावेळी उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, कारभारी महाराज झरेकर, गणेशानंदगिरी महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वासराव गडाख, अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, डॉ रेवन्नाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिंडी सोहळ्याना आमदार शंकरराव गडाखांनी दैनंदिन वापराचे साहित्य भेट दिल्याबद्दल आमदार गडाखांचा वारकरी मंडळींनी सत्कार केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT