file photo 
अहमदनगर

सोनईत हॉटेलमालकावर गोळीबार ; दहा जणांविरुद्ध गुन्हा

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  तुझ्या आईने आमच्याविरुद्ध फिर्याद का दिली, या कारणावरून सोनईत हॉटेलमालकावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी सशस्त्र हल्ल्यात हा हॉटेलमालक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (दि. 30) सायंकाळी सोनई-राहुरी रस्त्यावरील साईराम उडपी हॉटेलसमोर ही घटना घडली. या प्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लहू रामनाथ धनवटे (रा. बालाजी नगर सोनई) यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तुझ्या आईने आमच्याविरुद्ध फिर्याद का दिली, या कारणावरून 30 ऑक्टोबर रोजी हॉटेल साईराम समोर आरोपींनी कोयता, तलवार, चॉपर, लाकडी दांडक्याने हातावर पायावर व डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. कट्ट्याने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून बुट्ट्या भांडलकर, आदी वैरागर, विशाल ऊर्फ पिल्या वैरागर, हरी विलास साळुंखे, मंगेश विलास साळुंखे (सर्व रा. घोडेगाव ता नेवासा), ठकन आल्हाट, सागर ईलग, आकाश सुभाष बर्डे ऊर्फ भावड्या, अविनाश आल्हाट (सर्व रा. मोरे चिंचोरे), अजय राजेंद्र शिंदे (रा सोनई) यांच्यावर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात तपास करीत आहेत. मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक धनवटे हे नगर येथे उपचार घेत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT