अहमदनगर

कर्जतमध्ये बिंगोचा शिरकाव; दूरगाव शिवारात छापा

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बिंगो नावाचा ऑनलाईन जुगार तालुक्यात पोहोचला असून, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दूरगाव येथे छापा टाकून कारवाई केली. छाप्यात तब्बल 48 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील व त्यांचे सहकारी कर्जत हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पाटील यांना खबर्‍यामार्फत दूरगाव शिवारात ऑनलाईन बिंगो नावाचा हारजीतीचा खेळ सुरू असल्याची माहिती दिली.

ही माहिती मिळाल्यानंतर पाटील यांनी सहकार्‍यांसह त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये त्यांना ऑनलाइन बिंगो नावाचा जुगार व त्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन 48हजार 980 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी. विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, संभाजी वाबळे, दीपक कोल्हे, महादेव कोहक, मनोज मुरकुटे, नितीन ढवळे यांनी केली. दरम्यान, तालुक्यात बिंगो नावाचा ऑनलाईन जुगार पोहोचला आहे. यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT