अहमदनगर

नगर ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदारयाद्या आता 10 ऑगस्टला

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदारयादीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला होता. परंतु राज्यातील काही भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे संगणकीकृत प्रभागनिहाय मतदारयादी तयार करताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आता पारंपरिक पद्धतीने मतदारयादी तयार होणार असून, 10 ऑगस्टला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात मुदत संपणार्‍या 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभागरचना 17 मार्चलाच प्रसिद्ध झाली.

त्यानंतर 14 जुलै रोजी 188 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अंतिम आरक्षणदेखील प्रसिद्ध केले आहे. अंतिम आरक्षण प्रसिद्ध होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने 6 जुलै रोजी 188 ग्रामपंचायतींच्या मतदारयादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. ही मतदारयादी पारंपरिक पद्धतीने न करता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी 1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी वापरण्याचे निर्देशदेखील दिले होते. त्यानुसार 31 जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन आयोगाने मतदारयादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदारयादी आता 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीवर 10 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. उपलब्ध झालेल्या हरकती निकाली काढल्यानंतर 188 ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT