Documents of Pooja Khedkar found
पूजा खेडकर यांची कागदपत्रे सापडली Pudhari
अहमदनगर

Pooja Khedkar | पूजा खेडकर यांची कागदपत्रे सापडली

पुढारी वृत्तसेवा

नगर : बहुचर्चित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ज्या आधारे दिले गेले, ते दस्त सापडले असून त्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे.

प्रमाणपत्रांना आधार काय?

पूजा खेडकर यांना दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र कोणत्या आधारे दिले, त्याचा दस्तावेज सापडत नसल्याने सुरुवातीला वेगवेगवेळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, सोमवारी संबंधित केसपेपरसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे अखेर हाती लागली आहेत. त्या प्रमाणपत्रांसह त्याच्याशी निगडित दस्तावेज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

संजय घोगरे ह्यांच्या टीमने शोधली कागदपत्रे

नगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना 2018 मध्ये नेत्र दिव्यांगत्व, तर 2020 मध्ये मानसिक आजाराचे प्रमाणपत्र दिले गेले. नंतर 2021 मध्ये या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले होते. मात्र ही प्रमाणपत्रे नेमकी कशाच्या आधारे दिली, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नव्हती. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी ही कागदपत्रे शोधण्यासाठी टीम कामाला लावली होती.

दस्तावेज जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती

कोरोना काळातील स्वच्छता, त्यानंतरची रंगरंगोटी यामुळे रेकॉर्डरूममधील कागदपत्रे इतरत्र हलविली होती. त्या कागदपत्रांची शोधाशोध जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केली. त्यानंतर खेडकरांशी संबंधित कागदपत्रे हाती लागली आहेत.

पूजा खेडकर यांनी 2018, 2020 आणि 2021 या दरम्यान दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेतेवेळी काढलेले केसपेपर, त्यावरील तत्ज्ञ डॉक्टरांचे रिमार्क आणि त्यानंतर दिलेले प्रमाणपत्र असा सर्व दस्तावेज हाती लागला असून, तो तो जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

SCROLL FOR NEXT