अहमदनगर

सर्वांना सोबत घेवून सर्वांगिण विकास : आ.आशुतोष काळे

Laxman Dhenge

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : माझ्यावर मतदार संघाची जबाबदारी देताना सर्वच घटकांना माझ्याकडून विकासाची अपेक्षा होती. माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असल्यामुळे सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सर्वांना सोबत घेऊन सर्वच घटकांचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे 50 लक्ष रुपये निधीतून श्री लक्ष्मीआई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, 25 लक्ष रुपये निधीतून तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करणे, 10 लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिर ते समाजमंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे व 10 लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे अशा एकूण 95 लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गौतम बँकेचे संचालक विजयराव रक्ताटे, गोदावरी खोरेचे संचालक विजयराव थोरात, जिनिंग प्रेसिंगचे संचालक महेश लोंढे, सरपंच उषाताई दुशिंग, दादासाहेब साबळे, विजय पंढरीनाथ रक्ताटे, प्रकाश देशमुख, आप्पासाहेब लोहकणे, अमोल हाडोळे, सोमनाथ महाजन, भाऊसाहेब काशीद, सुनील लोंढे, दीपक रोहोम, भाऊसाहेब फटांगरे, विशाल शितोळे, अविनाश निकम, अनंत रक्ताटे, संभाजीराव देशमुख, संजय देशमुख, सोपान काशिद, दिनकर रोहोम, विशाल जाधव, ज्ञानेश्वर रक्ताटे, जावेद सय्यद, बंटी सय्यद, वाल्मिक दैने, लक्ष्मण जाधव, संदीप धिवर, अरुण दैने, परसराम रक्ताटे, किरण रोहोम, शामराव लोहकणे, मतीन सय्यद, नंदू गायकवाड, ललित धोंडे, एकनाथ दुशिंग, सार्वजनिक बांधकाम अभियंता रवींद्र वाकचौरे, राऊत, पंचायत समितीचे जगताप, तलाठी पराड, ग्रामसेवक सुर्वे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT