अहमदनगर

नगर : झेडपीच्या विद्यार्थ्यांना कोडींगचे धडे

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी जिल्हा परिषद नगर व कोड टू इनहांस लर्निंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातील कोल्हारच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक, विज्ञान आणि कोडींग बद्दल शिकवण्यासाठी दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा शनिवारी समारोप झाला, अशी माहिती मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यानी दिली. दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्याा ज्ञानात अजून भर पडली आहे.हा कार्यक्रम खूप सर्जनशील,नियोजित आणि उत्तम होता.

या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंग सारख्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता खूपच वाढीस लागली. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना विविध समस्या ओळखणे, ती समस्या त्या आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि या समस्येचे स्वरुप कोडींगच्या स्वरूपातून मांडून आपल्या समस्या व्यक्त करण्यास मुलांना यामुळे संधी मिळाली. कोड ऑन व्हिल्स या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक राहुल बांगर, प्रीती व मीनाक्षी यांनी दोन दिवस अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिकविले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना कोडींग बद्दल माहिती देऊन समस्येवर आधारित प्रोजेक्ट बनवण्याचा सराव देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी बनवलेला प्रोजेक्टचे प्रदर्शन 7 जुलै रोजी पालक, ग्रामस्थ व मान्यवर यांचे समोर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पालवे, सरपंच राजू नेटके, सेवानिवृत्त शिक्षक महादेव पालवे, माजी सैनिक गोरख पालवे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रामदास आव्हाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व संदीप आंधळे सर्वांचे आभार मानले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT