अहमदनगर

कान्हूरपठार : सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू : आ. उमाताई खापरे

अमृता चौगुले

कान्हूरपठार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील जनतेला व विशेष करून महिलांना रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज व इतर मूलभूत सुविधा पुरवणे हा भाजपचा अजेंडा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हाच भाजपाच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे मत विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी कान्हूरपठार येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले आहे.

भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या पाठपुराव्यामुळे पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे चिंचोली कान्हूर पठार गारगुंडी या गावांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने कान्हुरपठार येथील भागवत मळा येथील वरूंडी माता सभामंडप आमदार उमाताई खापरे यांच्या निधीतून रविवारी शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, राहुल पाटील शिंदे, शिवाजी खिलारी, सुभाष दुधाडे, सागर मैंड, कृष्णाजी बडवे, नवनाथ सालके, सरपंच गोकुळ काकडे, शिक्षक नेते प्रविण ठुबे, आकाश सोनवळे, पोपट लोंढे, संजीव मंगोंडेकर, बबनराव आतकर, यादवराव गोपाळे, अर्जुन नवले, दत्ता ठुबे, शोभाताई ठुबे, कानिफनाथ ठुबे, तुकाराम ठुबे, दादाभाऊ ठुबे, अनिल तिकोणे,भरत ठुबे, गोकुळ ठुबे, विश्वनाथ गुंड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण ठुबे यांनी केले.

विकास कामांच्या निधीसाठी जुने संबंध कामाला आले : कोरडे

पारनेर तालुक्यातील आमचा भाग ना कृष्णा वा गोदावरी खोर्‍यात नसुन पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.आजही कान्हुर पठार व परिसरात पाण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उमाताई खापरे यांच्या निधीची मदत झाली असल्याचेही विश्वनाथ कोरडे म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT