अहमदनगर

संगमनेर : चोरून विज वापरणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमृता चौगुले

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत चोरून वीज वापरणार्‍या तसेच तपासणी करून दिलेल्या वीज बिलाचा भरणा न करणार्‍या दोघांविरोधात विज कंपनीच्या अधिकार्‍यांनी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता समाधान घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवे बुद्रुक येथील शशिकांत धोंडीबा कुटे आणि बिरेवाडी येथील बाळासाहेब पांडुरंग क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले की, 8 मे 2023 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बाह्यश्रोत कर्मचारी के. के. गाडेकर, वरिष्ठ तंत्रज्ञ डी. एस. शेळके यांच्या समवेत कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी करत असताना मांडवे बुद्रुक येथे शशिकांत कुटे हे त्यांच्या सलून दुकानांमध्ये समोरील लघुदाब वाहिनीवरून आकडा टाकून अनधिकृत वीज चोरी करताना आढळून आले होते. त्यामुळे त्यांचा विज वापर लक्षात घेता त्यांना 11,960 रुपयांचे दंडाचे विज बिल देण्यात आले. मात्र वारंवार मागणी करून देखील त्यांनी वीज बिलाचा भरणा केला नाही.बिरेवाडी येथील बाळासाहेब क्षीरसागर यांच्या घरी आकडा टाकून वीज वापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावरही कारवाई झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT