अहमदनगर

संगमनेर : जागेवरून वाहक-प्रवाशात वाद; चालकाने रस्त्यावर थांबवली बस

अमृता चौगुले

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बसमध्ये गर्दी असल्याने बसण्यांस जागा नसल्याने एक महिला प्रवासी दरवाजा जवळ बसली. त्या महिलेस वाहक महिलेने येथून उठ म्हणताच, दोघीमध्ये शाब्दिक वाद झाले. यात प्रवासी महिलेने बस तुझ्या … आहे का? असा सवाल केल्याने वाहक महिला संतप्त झाल्याने बसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. मोहटादेवी -नाशिक बस (क्र. एम. एच. 11, बी. एल. 9384) ही बस गुरूवार दि. 22 जून रोजी संगमनेर बसस्थानकात दुपारी 2 वाजेच्या सुमारास आली. प्रवासी बस मध्ये चढण्यासाठी धडपड करत होते.

गर्दी झाल्याने प्रवासी बस मध्ये चढत असतांनाच एक महिला प्रवासी दोन महिलासह बसमध्ये चढली. बसमध्ये जागा नसल्याने सर्वच प्रवासी जागा शोधत होते. बसची वेळ झाल्याने गर्दीतच चालकाने बस सुरू केली. बसण्यास जागा नसल्याने एक महिला दरवाजा जवळच बसली. जाणारे येणारे प्रवाशांना त्रास होतो. रस्त्यातून उठा नाही तर खाली उतरा असा इशारा वाहकाने देताच. प्रवाशाने मला बसायला जागा नाही, येथेच बसणार असे सुनावले . अन्य वृद्ध महिलाही बरोबर असल्याने त्याही वाहकाला विनंती करत होत्या.

मात्र शब्दाने शब्द वाढत गेला. महिला वाहक व महिला प्रवासी याचा वाद तीव्र झाल्याने पारा सुटून प्रवाशाने वाहकाला बस काय तुझ्या … आहे का? असे सुनावताच हे वाक्य वाहकाच्या जिव्हारी लागले. बस थांबवा, तुम्ही खाली उतरा तशी बस पुढे जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेतला. वाद वाढल्याने नाशिक -पुणे महामार्गावर यशोधन कार्यालयासमोर चालकाने बस थांबवली. वाहकाने दरवाजा उघडला व प्रवाशाला खाली उतरण्यास सांगितले. पण प्रवासी महिलाही खाली उतरेना तिने माफी मागितली .

पण वाहक महिलेने हीने माझा . … काढला खाली उतरा. बसमध्ये सुरू असलेला वाद पाहून बघ्याची गर्दी झाली. अनेकानी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी तीन प्रवासी महिला खाली उतरल्या तशी वाहकाने बस जावू द्दा असे म्हणताच प्रवाशाने पुन्हा दरवाजा धरला, मी बस बरी जावून देईन असे म्हणत बस अडवली. हट्टाने महिला बसमध्ये चढली वाद पुन्हा सुरू झाला अशा वादातच दरवाजा बंद झाल्याने चालकाने बस सुरू केली. पुन्हा वाहक महिलेने बस पोलिस स्टेशनला घ्या, असा पवित्रा घेतला. या वादावादीत बस नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाली.

महिलांच्या वादात पडू नये

वाहक महिला व प्रवासी महिलांचा वाद सुरू असतांना चालकाशी चर्चा करून मध्यस्थी करण्याची विनंती केली. तेव्हा चालकाने कायदा सांगतो महिलांच्या अशा वादात पडू नये. नंतर खूप त्रास होतो, असा अनुभवाचा सल्ला दिला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT