श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव शिवारातील प्रवरा नदी जवळ समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटचा उजेड डोळ्यावर आल्याने भरधाव वेगाने येणार्या स्विफ्ट कारने महामार्गावर अस णार्या रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात मोहन बबन अभंग (वय 35, रा देवाचा मळा, संगमनेर) या फिटर असणार्या तरुणाचा कारच्या स्टेअरिंगमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्रीदहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील देवाचा मळा येथे वाहन दुरुस्तीचे दुकान चालवणारा मोहन अभंग हा तरुण काही कामानिमित्त चार चाकी स्विफ्ट कार क्र. एम. एच. 43/ ए.एल.0997) पुणे-नाशिक महामार्गाने चंदनापुरीकडे गेला होता. रात्री साडेदहा च्या सुमारास तेथून माघारी येत असताना त्याचे वाहन खांडगाव फाट्याजवळील प्रवरानदीच्या पुलावर असतांना समोरुन येणार्या वाहनाच्या प्रखर दिव्यांमुळे त्यांचा अंदाज चुकला आणि त्याचे वाहन रस्ता दुभाजकास जोराने जाऊन धडकले असता मोठा आवाज झाला असता आस पाच्या नागरिकांसह रस्त्याने जाणार्या काही प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त वाह नाकडे धाव घेत पाहणी केली.
परिसरातील काही तरुणांनी या अपघा ताची माहिती संगमनेर शहर पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहणी केली असता अपघात झालेल्या वाहनात मोहन अभंग एकटाच होता. यावेळी नाग रिक व पोलिसांनी मदतकार्य करीतत्याला वाहनाबाहेर काढले आणि तातडीने रुग्ण वाहिकेतून उपचारार्थ मेडिकेव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र दुर्दैवाने या अपघातात त्याला जबर मार लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्या चे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर नगरपालिकेच्या कुटीर रुग्णाल यात नेण्यात आला त्याठिकाणी शवविच्छे दन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि संगमनेरच्या स्मशान भूमीमध्ये त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहन अभंग या फिटर असणार्या तरुणाच्या अपघाती मृत्यूने देवाचा मळा परिसरातील अभंग कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. अतिशय शांत आणि संयमी स्वभाव, सगळ्यांशी गोडबोलणारा आणि निष्पाप असलेल्या मोहन अभंग याच्या संपर्कात येणारा प्रत्येकजण त्याचे कौतुक करीत. कष्टातून त्याने आपल्या वडीलांच्या प्रयत्नांना सतत साथ दिली. त्याचा अपघाती मृत्यू अनेकांना वेदना देणारा ठरला आहे.
हेही वाचा