अहमदनगर

टाकळीभान : गुन्हेगार नियंत्रणासाठी गावात कॅमेरे बसवावेत

अमृता चौगुले

टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील सर्व व्यापारी वर्गाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. एक कॅमेरा पोलिस प्रशासनासाठी रस्त्याच्या दिशेने लावण्यात यावा, असे आवाहन श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले. टाकळीभान चौकी समोर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी पो. नि चौधरी बोलत होते. चौधरी पुढे म्हणाले, सुरक्षाबाबत ही मिटींग असून किरकोळ प्रकरणावरून दंगली घडविण्याचे काम समाज कंटकाकडून केले जात आहे. वातावरण दुषीत करण्याचे काम केले जात आहे.

तसेच सोशल मीडियावर चुकीचे संकेत टाकू नका, त्यामुळे काही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. टाकळीभान गाव मोठे असून रस्त्यावरील गाव आहे. येथे अनेक चोर्‍या झालेल्या आहेत, काही घटनाही घडलेल्या आहेत. गाव चांगले असल्याने गावात जातीय तणाव कधी निर्माण झालेला नाही, त्याचा मला अभिमान आहे. रात्रीचा बंदोबस्त देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. ग्रामपंचायतने कॅमेरे बसवावेत व सर्व ग्रामस्थानी सहकार्य करावे व एक कॅमेरा पोलिस स्टेशनलाही द्यावा, असे आवाहन चौधरी यांनी केले.

यावेळी उपस्थित व्यापारी व ग्रामस्थांनी सुचना मांडल्या. गावाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी दोन पोलिस देण्यात यावेत, रात्रीची गस्त सुरू करावी व ग्रामपंचायतने सायरन सुरू करावे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षतेसाठी सकाळी 7 ते10 या वेळेत बसस्थानक परिसरात दोन पोलिस तैनात करावेत अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केल्या.

यावेळी पो. नाईक अनिल शेंगाळे, बाबा सय्यद, राजेंद्र कोकणे, आबासाहेब रणनवरे, शिवा साठे, अतुल गोड, अतुल गवांदे, प्रदीप पाटील, अब्दुल देशमुख, प्रा. जयकर मगर, संदिप टुपके, पवन काठेड, रविंद्र भालसिंग, संभाजी धोत्रे, बापूसाहेब नवले, शिवाजी शिंदे, यशवंत रणनवरे, विलास दाभाडे, सुनिल बोडखे, मोहन रणनवरे, प्रा. कार्लस साठे, बापूसाहेब शिंदे, शंकर पवार, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT