अहमदनगर

संगमनेर : अत्याचार प्रकरणी कॅफे चालकास अखेर अटक

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दोघां तरुणांसह नांदूर शिंगोटे व शिर्डी येथील लॉज मालकास अटक केली आहे. तर संगमनेर येथील कॅफे चालकासही अटक करण्यात आली. त्यामुळे आता अत्याचार प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच झाली. संगमनेर शहरातील महाविद्यालय शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीवर शहरातील कॅफे तसेच नांदूर शिंगोटे व शिर्डी येथील लॉजवरती किरण सोपान राऊत व आशिष नानासाहेब राऊत या दोघांनी वेळोवेळी अत्याचार केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी दोघा नराधमांसह चार सहआरोपी व सहा ते सात जणांवरती पोक्सो कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. किरण आणि आशिष राऊत यास अटक केली होती. त्यानंतर नांदूर शिंगोटे येथील साई तेज लॉजचा चालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर, शिर्डीचा लॉज चालक आकाश भास्कर बोंडारे या दोघांना याप्रकरणी सह आरोपी करत त्यांना अटक केली आहे, हे चारही जण सध्या पोलीस कोठडीत आहे

या प्रकरणातील संगमनेरचा कॅफे क्रश बक्सचा मालक राहुल गौतम भालेराव, ( रा. भालेकर वस्ती मालदाड, संगमनेर) याला देखील तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी मंगळवारी अटक केली. भालेराव यास पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता त्यास एकदिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणशातील अजून दोन जण पसार असून त्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT