अहमदनगर

नगर बाजार समितीत जेमतेम आवक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने बाजरी, मूग, सोयाबीन, उडदाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत या शेतीमालाची जेमतेम आवक होत आहे. बाजार समितीत काल ज्वारीची 18 क्विंटल आवक झाली. तीन ते साडेतील हजार रुपये क्विंटलप्रमणे ज्वारीची विक्री झाली. बाजरीची 21 क्विंटल आवक झाली. बाजरीला 2400 ते 2700 रुपये भाव निघाला. हरभर्‍याची 250 क्विंटल आवक झाली असून, 4200 रुपयांपासून साडेपाच हजार रुपयांपर्यंत हरभर्‍याला भाव मिळाला. सध्या हरभर्‍याची पेरणी सुरू असल्याने बियाण्यासाठी हरभर्‍याला मागणी होताना दिसते. मुगाचे यंदा उत्पन्न घटले. काल मुगाची केवळ 23 क्विंटल आवक होऊन 5000 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. उडदाचे जामखेड, नगर तालुका, पारनेरमध्ये काही प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उडदाची 13 क्विंटल आवक होऊन8 हजार ते साडेआठ हजार रुपयांप्रमाणे विक्री झाली.

सोयाबीनला पाच हजार रुपये भाव
वेळेवर पाऊस न झाल्याने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली. गेल्या वर्षीपासून सोयाबीन भाव पाच ते सहा हजारांच्या दरम्यान स्थित आहेत. भाववाढ होईल, या अपेक्षने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे. मात्र, उत्पादन घटूनही सोयाबीनचे भाव पाच हजारांच्या पुढे सरकले नाहीत. काल 711 क्विंटल आवक झाली. त्याला 4700 ते 5000 रुपये भाव मिळाला.

बाजार समितीत सोयाबीन विका
सोयाबीनच्या भावात घसरण झाल्याने आगामी काळात राज्य सरकारने सोयाबीनला अनुदान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खासगी व्यापार्‍यांऐवजी बाजार समितीत सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन समितीचे सचिव अभय भिसे यांनी केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT