अहमदनगर

नगर : मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍याला अटक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गड, मांजरसुंबा या देवस्थानांमधील तीन दानपेट्या फोडून रोख रक्कम चोरणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोरक्षनाथ गडावरील मंदिरात 27 जुलै रोजी चोरी झाली होती. एलसीबीच्या पथकाने दोन पेट्या फोडणार्‍यापैंकी एका आरोपीला वाकोडी (ता.नगर) येथून अटक केली. महेश सूर्यभान पवार (वय 25, रा. पदमपूरवाडी, वाकोडी, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. इतर पाच पसार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पवार याने त्याचे साथीदार संजय गुलाब पवार, अनिकेत सोपान पवार (दोन्ही रा. पदमपूरवाडी) व सोनू लहू बर्डे (रा. शिराढोण, ता. नगर) यांच्या मदतीने मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.

एप्रिल 2023 मध्ये आरोपी पवार याने त्याचा साथीदार किरण विलास पवार याच्यासोबत वाघुंडे खुर्द (ता.पारनेर) येथील दत्तमंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरातील दानपेट्या फोडणार्‍या एकाला अटक केली असून, दहा हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकूट व दहा हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. महेश सूर्यभान पवार सराईत गुन्हेगार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT