अहमदनगर

वैजापुरातील शनि-देवगाव बंधार्‍यास मान्यता

अमृता चौगुले

माळवाडगांव : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर – वैजापूर तालुक्यातील तीस गावांचा शेती व पिण्याचे पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार्‍या गोदावरी वरील शनि देवगाव उच्च पातळी बंधार्‍यास छत्रपती संभाजीगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. याचा फायदा श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठवरील गावांतील शेतकर्‍यांना होणार आहे. या बंधार्‍याला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आमदार रमेश बोरनारे आभार मानले आहे.

वैजापूर – श्रीरामपूर तालुक्याची सीमा हद्द समजल्या जाणार्‍या गोदावरी नदीवरील शनी- देवगांव येथील उच्च पातळी बंधार्‍यास शासनाने प्रशासकीय मंजुरी देऊन 285 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. या घोषणेचे पंचक्रोशीतील वैजापूर – श्रीरामपूर तालुक्यातील लाभधारक गावोगावच्या शेतकर्‍यांनी स्वागत करून शनी- देवगांव येथील रामेश्वर मंदिर प्रांगणात आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बोरनारे यांचा खास सत्कार व आनंदोत्सव सभेचे आयोजन केले.

संबंधित बातम्या :

या विजय आनंदोत्सव सभेस नागमठाण, अवलगांव, हमरापूर, बाजाठाण, शनी- देवगाव, चेंडूफळ, श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, कमालपूर, खानापूर, महांकळवाडगांव, माळवाडगांव येथील लाभधारक शेतकर्‍यांनी सभेस उशीर होऊनही प्रचंड गर्दी केली होती.
या आनंदोत्सव सभेत बोलताना आ.रमेश बोरनारे म्हणाले की, मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे अनेक जण ब़ोलत होते. परंतू विकासकामे खेचून आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर मी ठाम होतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शनी- देवगांव बंधार्‍याच्या मान्यतेसाठी मी जर मुख्यमंत्री एकनाथ यांच्या बरोबर गेलो नसतो तर आज कदाचित ही मान्यता मिळाली नसती.
वैजापूर तालुक्यातील बाजाठाण फाटा ते चेंडूफळ या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून या रस्त्यामुळे वक्ती पानवी, माळी घोगरगाव, बाजाठाण, चेंडूफळ ग्रामस्थांची समस्या दुर होईल.

याप्रसंगी हरिशरण महाराज, संदीपान महाराज, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंखे, जयदीप चव्हाण, संजय बोरनारे, रामभाऊ बारसे, उप- तालुका प्रमुख भाऊराव भराडे, प्रकाश शेळके, रामनाथ तांबे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT