जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत 1 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल देविदास पळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 खिलार बैल, एक संकरित वासरू, दोन म्हशी. टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्री सव्वा बारा वाजता पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या समवेत गस्त घालत असताना रुन कर्जत पोलिस ठाण्याकडेे जात असताना कर्जतकडून जामखेडकडे एक टेम्पो येताना दिसला. त्यास थांबविले असता त्यात दोन खिलार बैल, एक संकरित वासरू, दोन म्हशी आढळल्या. टेम्पोचालकाचे नाव विजय एकनाथ अवसरे (वय 28, रा. टेकाळेनगर जामखेड) असे आहे. त्याने जनावरे राजू कुरेशी (रा. राशीन ता. कर्जत) याच्या मालकीची आहेत.
हेही वाचा