अहमदनगर

अहमदनगर जिल्हा बँकेतून 296 कोटींचे पशुपालन कर्ज!

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सभासदांचे हित जोपासण्यास नेहमीच प्राधान्य देणार्‍या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 296 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करत राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. सवलतीच्या दरातील कर्जवाटप, प्रधानमंत्री फसल विमा योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व एकरकमी कर्ज परतफेड योजना अशा अनेकांचा त्यात समावेश आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँकेने सवलतीच्या व्याज दरात 296.89 कोटी इतके पशुपालन खेळते भांडवल कर्ज वितरण केले आहे. राज्यात सर्वाधिक कर्ज देणारी जिल्हा बँक पहिलीच असल्याची माहिती जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर जयंत देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

पिक कर्जाच्या बाबतीत बँकेचे एकरी कर्जदार हे राज्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वात जास्त असून, त्याचा फायदा जिल्हयातील प्राथमिक वि.का.सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना होतो. 21 जुलै 2023 अखेर जिल्हा बँकेमार्फत 2 लाख 99 हजार 581 शेतकरी सभासदांना 2337.82 कोटी कर्ज वाटप केलेले आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाचे 86 टक्के कर्ज वाटप झालेले आहे. अद्याप कर्ज वाटप सुरूच आहे. जिल्ह्यातील एकूण पिक कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा 75 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.

सर्वसमावेशक पिक विमा योजनेत समावेश झालेल्या शेतकर्‍यांकडून प्रति पिक अर्ज फक्त 1 रुपया भरून घेवुन विमा उतरविणे सूचित केले होते. त्यानुसार बँकेने कर्जदार शेतकरी सभासदांचा पिक विमा हप्ता बँक स्वनिधीतून भरण्याचे ठरविले आहे. नाबार्डकडून 2020-21 सालाची 3 टक्के व्याज सवलत 227902 शेतकर्‍यांची रकम 33.56 कोटी 22 जुलै 2022 रोजी बँकेस प्राप्त झालेली असून ती रक्कम त्याच दिवशी तालुका शाखांना तालुक्यातील कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती वर्ग केलेले आहेत. तसेच 2021-22 सालाचे 3 टक्के व्याज सवलत प्रस्ताव 2 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हयातील 2 लाख 79 हजार 130 शेतकर्‍यांची 32.81 कोटी नाबार्डकडे प्रस्ताव सादर केलेला असून अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही.

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (राज्य शासन) याबाबत अहमदनगर जिल्हा बँक दरवर्षी वि.का. सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्पमुदत पिक कर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्ज पुरवठा करत आहे. यामुळे जिल्हयातील शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सवलत योजनेअंतर्गत 3 टक्के याप्रमाणे 6 टक्के व्याज सवलत मिळत आहे. शेतकर्‍याची व्याजाची रक्कम पूर्णपणे त्याचे बँक खात्यात जमा होवून त्याला शुन्य टक्के व्याजदर पडत आहे.

एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकीत शेतकरी सभासदांना शासनाचे विविध योजनेचा लाभ होणेकामी राज्यातील एकमेव अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाव्दारे घेण्यात आलेला आहे. याशिवाय कोराना काळात पिक कर्ज व पशुपालन व खेळते भांडवल कर्ज मागणी येईल, त्यास सरसकट कर्ज वितरण करून शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात मोठा दिलासा दिला, अशीही माहीती जिल्हा बँकेचे प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT