अहमदनगर

अकोले : अंबीत धरण ओव्हर फ्लो ! पाणी पिंपळगाव खांड धरणाकडे

अमृता चौगुले

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपासून भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे नवीन पाणी धरणात येण्यास सुरूवात झाली आहे. मुळा पाणलोटातील 193 दशलक्ष क्षमतेचे अंबीत धरण बुधवारी दुपारच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. ओव्हर- फ्लोचे पाणी पिंपळगाव खांड धरणाच्या दिशेने झेपावले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली. यंदाचा पावसाने उशिराने हजेरी लावली तरी धरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड परिसरात धुव्वॉधार पावसाने अंबित तीन दिवसांतच ओसंडून वाहू लागले आहे.

मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले 193.97 दशलक्ष घनफूट क्षमतेचे अंबित हा पहिला लघु प्रकल्प. अंबितमधील ओव्हर फ्लोचे पाणी लवकरचं पिंपळगाव खांड धरणात पोहोचणार आहे. पिपळगाव खांड भरल्यानंतर पावसाचे पाणी मुळा धरणाच्या दिशेने आगेकूच करणार आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर रिमझिम पाऊस सुरु असल्याने हरिश्चंद्रच्या पर्वतरांगेत उगम पावणारी मुळा नदी वाहती झाली आहे. भंडारदरा पाणलोटात क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणार्‍या 11 हजार 39 दशलक्ष घनफुट क्षमतेच्या भंडारदारा धरणातही नवीन पाण्याचा श्रीगणेशा झाला आहे. धरणांत नवीन 200 दशलक्ष घनफुट पाणी जमा झाले असून पाणीसाठा 5 हजार 236 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT