पुणे : हात जोडतो, पण सत्काराला बोलावू नका; तरुणीला वाचवणार्‍या युवकाचे आवाहन

पुणे : हात जोडतो, पण सत्काराला बोलावू नका; तरुणीला वाचवणार्‍या युवकाचे आवाहन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी त्या तरुणीवर उपकार केले नाहीत, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सर्वजण सत्काराला बोलावत आहेत. मात्र, त्या घटनेनंतर मी रुमवर गेलो, तेव्हा दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला? असे लोकांना सांगावे लागले असते. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. होत जोडतो मला सत्काराला बोलावू नका", असे आवाहन पुण्यात प्रियकराच्या हल्ल्यातून तरुणीला वाचवणार्‍या युवकाने केले आहे. लेशपाल जवळगे असे तरुणीला प्रियकराच्या हल्ल्यातून वाचवणार्‍या युवकाचे नाव आहे. पुण्यात तरुणीला वाचवल्यानंतर लेशपाल जवगळे याच्यावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक जण त्याला सत्कारासाठी बोलावत आहेत. मात्र, तरुणाने सत्काराला न बोलावण्याचे आवाहन केले असून त्यादिवशी काय घडले याचा घटनाक्रम सांगितला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरूगेट चौकीपासून हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि. २७) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर पसार होऊ पाहणार्‍या तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

शंतनू लक्ष्मण जाधव (वय 22, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी सुतारदरा कोथरूड येथील 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात तरुणी हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी टिळक रोडवरील एका इस्टिट्यूटमध्ये इंटेरिअर डिझायनरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरूडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनूसोबत परिचय झाला होता. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, शंतनू हा छोट्या-छोट्या कारणातून तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्यामुळे तिने डिसेंबर 2022 मध्ये त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यानंतरही तो तिला फोन करीत होता. भेटण्यासाठी न आल्यास मारहाण करण्याबरोबर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.

मात्र, तरीही तरुणीने त्याच्यासोबत संपर्क ठेवला नाही. त्यामुळे शंतनू चिडून होता. तो तिच्यावर कोयता उगारून थांबला होता, तेवढ्यात त्याच्या हातातील कोयता पकडत कोयत्याचा वार करण्यापासून वाचविले. माझ्यासोबत माझा एक मित्र आला. त्याने देखील त्याला पकडून मागे खेचले. मात्र, आरोपीने आमच्यावरही कोयता उगारण्याचा प्रयत्न केला. पण, त्या वेळेस जमाव त्याच्यावर तुटून पडला, असे लेशपाल जावलागे याने सांगितले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news